“आयुष्यमान भारत योजना” व “महात्मा फुले जन आरोग्य योजने” संदर्भात खासदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न

पुणे  : "आयुष्यमान भारत योजना" व "महात्मा फुले जन आरोग्य योजने" संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली.

खासदार डॉ मेधा कुलकर्णी, महाराष्ट्राचे आयुष्यमान भारत योजनेचे प्रमुख श्री प्रकाश शेटे, पुणे जिल्ह्यातील प्रमुख घटक यांच्या सोबत चर्चा होऊन यावेळी या योजनेच्या उपलब्धीबद्दल तसेच विविध हॉस्पिटलचे प्रश्न, रुग्णांना येणाऱ्या समस्या याबद्दल चर्चा झाली.

योग्य प्रतिसाद देणाऱ्या रुग्णालयांचा तसेच कमी योग्य प्रतिसाद देणाऱ्या रुग्णालयांचा लेखाजोखा घेण्यात आला.
कमी उपलब्धी देणाऱ्या रुग्णालयांच्या कारणांची मिमांसा करण्यात आली. पुणे जिल्ह्यामध्ये अपेक्षित च्या तुलनेत फक्त 50% आयुष्यमान भारत ची कार्ड काढण्यात आली आहेत. त्यासाठी अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सूचना देण्यात आल्या.
आयुष्यमान भारत महाराष्ट्र शासनाचे प्रमुख या नात्याने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी श्री ओमप्रकाश शेटे यांना खालील प्रमाणे सूचना केल्या,

१) कुटुंब प्रमुखाचे कार्ड असल्यास घरातील सर्व व्यक्तींचे कार्ड काढण्याची आवश्यकता नाही.
२) अन्नसुरक्षा योजना अंतर्गत १२ आकडी नंबर जनरेट होत नाही, त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, त्यासंदर्भात त्वरित उपाययोजना करावी.
३) आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सर्व हॉस्पिटलला सामावून घेण्यासंदर्भात तसेच, सर्व हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात लागू करण्यासाठी सूचना खासदार मेधा कुलकर्णी यांनी केल्या.


याप्रसंगी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, जिल्हाधिकारी श्री. सुहास दिवसे, श्री. डॉक्टर नागनाथ एम्पल्ले (सिविल सर्जन), श्री. अभय तिडके (असिस्टंट डिस्ट्रिक्ट हेल्थ), सौ. स्वाती लोखंडे (सीनियर डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर महात्मा फुले जन आरोग्य योजना), श्री. पी. एम. आंधळे (निरीक्षक धर्मादाय सह आयुक्त कार्यालय पुणे), तसेच विविध रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

See also  स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांसाठी जगल्यास प्रगत समाज निर्मिती शक्य – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन