बाणेर : कोथरूड मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. दर्जेदार कामांसाठी नागरिकांनी ही सहकार्य करावे, असे आवाहन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले. कोथरुड मतदारसंघातील एकूण ३५ कोटीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन नामदार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महिलांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी शहर सरचिटणीस पुनीत जोशी, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, नगरसेवक दीपक पोटे, सुशील मेंगडे, राजाभाऊ बराटे, किरण दगडे पाटील, अमोल बालडकर, दिलीप वेडे पाटील, अल्पना वरपे, छाया मारणे, डॉ . श्रद्धा प्रभूणे-पाठक, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, ज्योती कळमकर, हर्षाली माथवड, वृषाली चौधरी, भाजपा नेते गणेश कळमकर, अभिजीत राऊत, गिरीश भेलके, गिरीश खत्री, लहु बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, दिनेश माथवड, अजय मारणे, दीपक पवार, राहुल कोकाटे, विवेक मेथा, बापूसाहेब मेंगडे, आशुतोष वैशंपायन, कैलास मोहोळ, उत्तम जाधव, सचिन दळवी, ज्ञानेश्वर तापकीर, उमाताई गाडगीळ, अनिता तलाठी, अस्मिता करंदीकर, वंदना सिंग, कल्याणी टोकेकर, रिनाताई देशपांडे, रिनाताई रायकर, सुनिता रेडवाल, सुजाता धनकुडे, स्वाती मोहोळ, विठ्ठल आण्णा बराटे, आबासाहेब सुतार, शिवम सुतार, लक्ष्मण मेघावत, रणजीत हरपुडे, प्रदीप जोरी, प्रमोद कांबळे, नवनाथ ववले, प्रवीण अम्ले, सुभाष भोळ, राजेंद्र पाषाणकर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे. राज्याच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शहरातील नाल्यांवर संरक्षक भिंत बांधण्यासाठी २०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. तसेच, शहरातील इतर विकासकामांसाठी १०० कोटी रूपये मिळाले आहेत. तसेच, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून ही १६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. नागरिकांनी ही विकासकामे सुरु असताना सहकार्याची भूमिका घेतल्यास दर्जेदार कामे होतील, असे आवाहन केले.
दरम्यान, भूमिपूजन झालेल्या कामांमध्ये प्रामुख्याने राम नदी शुद्धीकरणासाठी इकोफिल्टर बसवणे, बाणेरमधील तुकाई मंदिरासाठी पायऱ्या बांधणे, रामनदीला संरक्षक भिंत उभारणे, रामनदीत सोडण्यात येणाऱ्या मलनिस्सारण वाहिन्या बंद करुन नवीन वाहिन्या टाकणे, महापालिकेच्या शाळांमधील विविध विकासकामे करणे, ज्युपिटर हॉस्पिटललगत नाल्यांवर संरक्षक भिंत बांधणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व नाना-नानी पार्क विकसित करणे, योगा सेंटर, ग्रीन गार्बेज आणि घंटागाडी उपलब्ध करून देणे, महापुरुषांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करणे यांसह अनेक विकासकामांचा समावेश आहे.