बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन व साईश्री हॉस्पिटल यांच्या सहयोगाने बाणेर येथे ‘ बीएमएकाँन २३ ‘ ही वैद्यकीय परिषद

बाणेर : बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन व साईश्री हॉस्पिटल यांच्या सहयोगाने बाणेर येथे ‘ बीएमएकाँन २३ ‘ ही वैद्यकीय परिषद संपन्न झाली.या परिषदे साठी सुमारे २५० डॉक्टर्स उपस्थित होते.


परिषदेचे उद्घाटन मां मुख्यमंत्री महाराष्ट्र श्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन व प्रसिद्ध गायक, दिग्दर्शक डॉ सलील कुळकर्णी यांच्या उपस्थतीत पार पडले.ह्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारताच्या युरोलॉजी असोसिएशन चे अध्यक्ष व उरोकुल हॉस्पीटल चे डायरेक्टर डॉ संजय कुलकर्णी तसेच साईश्री हॉस्पीटल चे डायरेक्टर डॉ नीरज आडकर , बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ राजेश देशपांडे उपस्थित होते.


हया प्रसंगी मां मुख्यमंत्री यांनी बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन करत असलेल्या कामाचे कौतुक केले व परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या.हया वैद्यकीय परिषद मध्ये एकूण १२ तज्ञ डॉ ची व्याख्यान आयोजित करण्यात आली होती.
त्यात डॉ प्रसाद बीवरे यांनी फिवर व तपासण्या ह्या वर चर्चा केली.
साईश्री हॉस्पीटल तर्फे डॉ नीरज.आडकर , डॉ नितीन देशपांडे यांनी मार्गर्शन केले
मेंदुरोग तज्ञ डॉ प्रियंका तोंडे यांनी अतिशय माहितीपूर्ण मार्गदर्शन केले.डॉक्टरांसाठी मोफत फायब्रो स्कॅन ही लिव्हर ची तपासणी डॉ प्रसाद भाटे लिव्हर तज्ञ यांनी आयोजित केली होती.
हया प्रसंगी नवनिर्वाचित सदस्याची ओळख व सत्कार करण्यात आला.
डॉ कविता चौधरी अध्यक्ष,डॉ सुषमा जाधव सेक्रेटरी,डॉ बबन साळवे कोषाअध्यक्ष हि परिषद यशस्वी करण्यासाठी अकॅडमी सेक्रेटरी डॉ पद्मनाभ केसकर , डॉ. प्रमोद उमरजी, डॉ प्रिया देशपांडे,डॉ सागर सुपेकर ,डॉ नारायण जेठवानी,डॉ प्रणव राडकर,डॉ दिपाली चिंचोले,डॉ रितू लोखंडे,डॉ दिपाली झंवर,डॉ .भ्याग्याशी कश्यप ,डॉ लीना अवटी.यांनी विशेष कष्ट घेतले .या परिषदेसाठी साईश्री हॉस्पिटल , मणिपाल हॉस्पीटल बाणेर , ड्रीम वर्क रेअल्टर यांचे विशेष सहकार्य लाभले.

See also  रस्ते विकास महामंडळाला आरईसी लिमिटेडकडून १७ हजार ५०० कोटींचे कर्ज उभारण्यास मान्यता