मनसेचे वसंत मोरे यांचा मनसेचा राजीनामा

पुणे  : मनसेचे पुण्यातील  नेते वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. वसंत मोरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.


ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मनसेला राम राम केल्याने राज ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातआहे. वसंत मोरे हे पक्षातील काही वरिष्ठांवर नाराज असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून रंगली होती. त्यातच त्यांनी अनेक खदखददेखील व्यक्त केली होती. त्यांनी आज सकाळीच ‘एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो’, अशा
आशयाची पोस्ट केली होती. त्यानंतर काही तासातच त्यांनी
मनसेचा राजीनामा दिला आहे.

See also  आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त हर्बायुतर्फे शनिवारी हर्बायु योग प्रभात अंतर्गत मोफत ऑनलाईन विशेष कार्यक्रम