वरीष्ठ पत्रकार पंकज खेळकर सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे : वरीष्ठ पत्रकार पंकज खेळकर (वय ५२) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराने आजारी होते.

‘आज तक’ व ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीचे पुण्यातील माजी प्रतिनिधी आणि वरिष्ठ पत्रकार पंकज खेळकर (वय ५२) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. पाषाण येथील सिंध सोसायटीत त्यांचे वास्तव्य होते. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. खेळकर हे मूळचे अकोला येथील असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते पुण्यात ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी संबंधित होते.

See also  बालगंधर्व परिवार महाराष्ट्र, मेघराज राजेभोसले फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाकार स्नेहमेळावा  उत्साहात संपन्न