जागतिक योग दिनानिमित्त पाषाण मध्ये योग शिबिराचे आयोजन

पाषाण : जागतिक योग दिनाच्या निमित्त भारतीय जनता पार्टी पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वर वाडी व ओमकार योग साधना केंद्र, पतंजली योग केंद्र, आर्ट ऑफ लिविंग, नवचैतन्य हास्य क्लब, सहज योग या सर्व योग परिवारातील संस्थांच्या माध्यमातून योग शिबिराचं आयोजन करण्यात आले होते.

अलिकडील काळात निरोगी व सदृढ जीवनाला महत्व प्राप्त झाले आहे.. त्यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे.. वेगवेगळे व्यायाम प्रकार अवलंबताना नियमीत योग करणेही तितकेच महत्वाचे आहे.. याबद्दलची जनजागृती व्हावी आणि नागरीकांमध्ये योग साधनेबद्दल आवड निर्माण होवून निरोगी जीवन जगता यावं या उद्देशानं या शिबिराचं पाषाण, सुस रोड येथील संत तुकाराम मंगल कार्यालयामध्ये आयोजन करण्यात आले होते.

परिसरातील जवळपास 600 नागरिकांनी या योग शिबिरात सहभाग नोंदवला. सुदृढ निरोगी निरामय जीवन जगण्यासाठी नागरिकांनी दररोज नित्यनियमाने योग साधना केली पाहिजे असे मत पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राहुल कोकाटे यांनी सांगितले.

यावेळी श्री रामदासजी ठोसर, श्री मकरंद टिल्लू ,श्री राजकिशोर त्रिपाठी यांसारख्या योग गुरूंनी सदर शिबिराला मार्गदर्शन केले श्री रत्नाकर मानकर, श्री रघुनाथ उत्पात, श्री हरीश पाठक ,श्री उत्तम जाधव, श्री दत्ता नवले ,श्री प्रवीण आमले, श्री प्रज्वल कोकाटे यांनी सदर शिबिराचे यशस्वी आयोजन केले.

See also  ज्येष्ठ लेखक, संशोधक,पुरोगामी विचारवंत दिवंगत प्रा. हरी नरके यांना कर्मभूमी हडपसर मध्ये श्रद्धांजली..