मराठा आरक्षणसाठी सकल मराठा समाज दक्षिण पुणे आणि पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज डेअरी चौक येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

कात्रज : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज सकल मराठा समाज दक्षिण पुणे आणि पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने एक दिवससीय लाक्षणिक उपोषण कार्यक्रम राजीव गांधी प्राणी संग्रहालय,कात्रज डेअरी चौक येथे आयोजित करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव निलेश सांगळे, मराठा महासंघाचे कार्याध्यक्ष अमर पवार, पुणे जिल्हा एन.एस. यू. आय. अध्यक्ष भूषण रानभरे पुणे जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश टापरे , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सोनालीताई मारणे आणि सनी काळे, प्रविण सस्ते, श्रृतिका पांगळे,सुनिता हिवरकर, शंकर कडू, वैभव शिळीमकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणात मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे सांगितले तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आम्ही आहोत ही भावना व्यक्त केली आणि एक मराठा ,लाख मराठा घोषणा देण्यात आली. या कार्यक्रमास सर्व मान्यवर तसेच भारती विद्यापीठ व कात्रज परीसरातील नागरिक उपस्थित होते.

See also  लोकन्यायालयाद्वारे प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा महाराष्ट्रात सलग दहाव्यांदा प्रथम स्थानी