चांदणी चौकातील स्वच्छतागृह कुलूप बंद का? नागरिकांसाठी खुले करावे शिवसेनेची मागणी

कोथरूड : चांदणी चौकामध्ये लाखो रुपये खर्च करून नागरिकांसाठी स्वच्छतागृह उभारले पण हे स्वच्छतागृह वापरासाठी खुले कधी होणार की यासाठी देखील भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असा प्रश्न शिवसेनेचे उपजिल्हा संघटक सचिन दगडे व युवा सेना उपजिल्हाधिकारी अमित कुडले यांनी उपस्थित केला आहे.

चांदणी चौकामधून हजारो प्रवासी दररोज हे जा करतात या प्रवासांच्या गरजांसाठी चांदणी चौकामध्ये स्वच्छता गृह उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी पूर्ण होऊन या परिसरात स्वच्छतागृह देखील उभारण्यात आले. परंतु स्वच्छतागृह अद्याप सुरूच झाले नसल्याने नागरिकांची कुचुंबना होत असून उघड्यावरच नैसर्गिकविधी नाईलाजाने उरकावे लागत आहेत.

स्वच्छतागृह उभारून देखील ते कुलूप बंद का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात असून हे स्वच्छतागृह तातडीने नागरिकांसाठी कोणतेही उद्घाटनाची वाट न पाहता करावे अशी मागणी युवा सेना उपजिल्हाधिकारी अमित कुडले यांनी केले आहे.

See also  व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती