पिरंगुट : मुळशी तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या योग शिबीराची व सहयोग शिक्षक प्रशिक्षणाची नुकतीच सांगता करण्यात आली.जवळपास एक महिना चाललेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरासाठी तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी हजर लावली होती.
पतंजली योगपीठ हरिद्वार आणि पुणे व पिंपरी-चिंचवड जिल्हा समितीच्या वतीने पिरंगुट येथील सनशाइन जॉय प्लाझा च्या प्रारंगना मध्ये या शिबीराचे आयोजत करण्यात आले होते.
तेव्हा या मध्ये पतंजलीच्या नामांकित योगशिक्षकांनी दररोज हजेरी लावून वेगवेगळ्या विषयावर योगा विषयी योग्य असे मार्गदर्शन केले यामध्ये शरीर शास्त्र,आयुर्वेद,योगशास्त्र,रोगानुसार योग,आहार पद्धत,अष्टांग योग,मानवी शरीर,योगसूत्रे,प्राणायाम,ध्यान,आसने, यावर मार्गदर्शन करण्यात आली.
महत्वाचे म्हणजे प्रांत प्रभारी बापू पाडाळकर यांनी व्हिडिओ कॉल द्वारे तर युवा राज्य प्रभारी अतुल यांनी देखील फोन द्वारे मार्गदर्शन केले
सांगता कार्यक्रा दरम्यान सह राज्य प्रभारी प्रितेश लाड व विनोद सागर यांनी 32 दिवस चाललेल्या या शिबिराचा आढावा देऊन सांगता समारंभाची सुरुवात केली तेव्हा हेमांगी माझीरे यांनी योग नृत्य करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या प्रसंगी शिवसेना नेते आबासाहेब शेळके,रामदास पवळे,तुषार पवळे,संतोष दगडे हे मान्यवर उपस्थित होते.
तालुका प्रभारी संजय लोमटे, प्रकाश देवरे,शंकर कोरे,राजेंद्र नाईकरे,दीपक राऊत तसेच सहप्रभारी मलकापा चौगुले,किशोर काळे,शिवाजी तंत्रे,बाबुराव कोळेकर,संतोष हगवणे,बाजीराव हगवणे अशोक माझीरे,भाऊसाहेब नजन,शंकर पवळे या सोबत माहेश्वरी लोमटे, कल्याणी राऊत,रेखा कोरे,वर्षा नगरे,मनीषा देवरे व हेमलता हगवणे यांनी या योग शिबिराचे नियोजन केले होते.
तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीडिया प्रभारी राजेंद्र नाईकरे यांनी केले.