बारामती मतदारसंघातील मतदार याद्या गुजरातमध्ये तयार झाल्या? गुजराती लिपीमध्ये मध्ये मतदारांची नावे सापडली

पुणे : बारामती मतदार संघा मधील लोकसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या गुजरातमध्ये तयार झाल्या आहेत काय असा प्रश्न मतदार याद्यांमध्ये गुजराती लिपी मध्ये सापडलेल्या नावांमुळे निर्माण झाला आहे.

महाळुंगे येथील भोर मतदार संघा २०३ तील याद्यांमध्ये काही मतदारांची नावे गुजराती लिपी मध्ये टाकण्यात आली आहेत. तसेच अनेक नावे ही बोगस नोंद करण्यात आली असून त्यांचे पत्ते योग्य रीतीने टाकण्यात आले नाहीत.

तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नाव नोंदणी करण्यात आली असल्याने मतदार याद्यांची संख्या देखील वाढली आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या या मराठी अथवा इंग्रजी नाव असलेल्या आवश्यक असताना या मतदार याद्यांमध्ये गुजराती लिपी मधील नावे कशी काय आली याबाबत  संशय व्यक्त केला जात आहे.

बोगस मतदार नोंदणीच्या आधारावरती निवडणुकीमध्ये फार मोठा गोंधळ घालण्याचा प्रयत्न होत असताना निवडणूक आयोगाकडून यावर काय कारवाई केली जाणार तसेच मतदार याद्यांमध्ये गुजराती नावे समाविष्ट झाल्या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी संतोष दादा मोहोळ यांनी केली आहे.

See also  सामाजिक उन्नतीच्या दिशेने पाऊले टाकण्याचा निर्धार - माजी सैनिक मारूती कांबळे यांची रयत स्वाभिमानी संघटना उपाध्यक्षपदी निवड