पौड : लवळे (ता.मुळशी) येथील पैलवान सागर तांगडे यांचे गुरुवारी निधन झाले. पैलवान सागर तांगडे कुस्ती कोच आणि राष्ट्रीय कुस्ती पंच म्हणून त्यांनी काम केले होते. तेपिरंगुट इंग्लिश स्कूल येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले होते.
भरे येथील क्रीडा संकुलात ग्रामीण खेळाडूंना ते मोफत कुस्ती प्रशिक्षण देत होते. त्यातून त्यांनी अनेक खेळाडू घडवले आहेत. याच क्रीडा संकुलाच्या १५ खेळाडूंनी नुकतेच डिसेंबर- जानेवारीमध्ये दिल्ली येथे राष्ट्रीय बेल्ट रेसलिंग कुस्ती स्पर्धेत ५ सुवर्ण, ६ रौप्य व ४ कांस्यपदक मिळवत नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी, मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह तालुक्यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी तांगडे यांच्या घरी भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
ते बाणेर बालेवाडीचे प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वरभाऊ तापकीर यांचे भाचे शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे , मा.सरपंच नारायण चांदेरे यांचे मावस भाऊ होत.