औंध आरोग्य विभागाकडून बाणेर पाषाण टेकडीवरील १७०० किलो प्लास्टिक दारूच्या बाटल्या स्वच्छता मोहिमेत जमा

पुणे : बाणेर पाषाण टेकडी वरील १७०० किलो प्लास्टिक बॉटल दारूच्या बाटल्या अँड क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता मोहिमेत काढण्यात आल्या.

औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत असलेल्या बाणेर पाषाण टेकडी येथे फिरायला येणाऱ्या तसेच अवैधरीत्या मद्यपान करणाऱ्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॉटल, पिशव्या, दारूच्या बाटल्या इत्यादी कचरा टाकून टेकडी परिसर अस्वच्छता केली जाते.


याकरिता मा. उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन श्री. संदिप कदम, श्री. संतोष वारुळे व औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय मा. महापालिका सहाय्यक आयुक्त श्री. गिरीष दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली औंध आरोग्य विभाग वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. विजय भोईर यांच्या नियंत्रणाखाली आरोग्य निरीक्षक श्री. नितीन लोखंडे, शिवाजी गायकवाड मोकादम श्री. किरण जाधव व विकास कांबळे सर्व सफाई सेवक यांच्या टीमने दोन दिवस संपूर्ण पाषाण टेकडी परिसर स्वच्छता करून अंदाजे १७०० किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.

See also  अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय व्यावसायिक स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण