हुकुमशाही वृत्तीचा पाडाव करू – आ. रविंद्र धंगेकर

पुणे : सर्वसमावेशक धोरण ठेवून प्रचार करू आणि हुकुमशाही वृत्तीचा पराभव करू,असे  काँग्रेसचे लोकसभा उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांनी सांगितले.

निवडणूक नियोजनासाठी इंडिया फ्रंटची बैठक शुक्रवारी काँग्रेस भवनात घेण्यात आली. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, सुभाष वारे, अजित अभ्यंकर, किरण मोघे, अन्वर राजन, संदीप ताम्हनकर, प्रशांत कोठडिया, मोहन वाडेकर, वसंत पवार, किरण पोकळे, अनिस अहमद, नीलम पंडित, वसुधा जोशी, रंजना पासलकर, इब्राहीम खान, अरविंद जक्का, अशोक तातुगडे, संदीप बर्वे आदी उपस्थित होते.

लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन भारतीय जनता पक्षाचा पराभव करू, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीमुळे आत्मविश्वास वाढल्याचे वक्त्यांनी सांगितले.

See also  'साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार २०२४' जाहीर