केंद्र शासनाच्या संस्थांमुळे भूमिहीन झालेल्या मराठा बांधवांनी जरांगे पाटील यांना दिलेले निवेदन

सुतारवाडी : पाषाण सुतारवाडी परिसरातील केंद्र शासनाच्या संस्थांमुळे भूमिहीन झालेल्या मराठा बांधवांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना निवेदन देत मराठा समाजातील प्रश्न सोडवण्याची विनंती केली.

पाषाण सुतारवाडी परिसरातील एच ई एम आर एल व ए आर डी ई तसेच केंद्र शासनाच्या विविध संस्थांसाठी 1969 मध्ये तुटपुंजा मोबदला देऊन मराठा समाजाच्या जागा अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. यावेळी काही नागरिकांना या संस्थांमध्ये नोकरी देण्यात आली होती परंतु भूमिहीन झालेल्या नागरिकांच्या पुढील पिढीला मात्र नोकरीत सामावून घेतले जात नाही. या संस्थांमधील भरती प्रक्रिया दिल्ली मधून केंद्र शासनामार्फत होत असल्याने महाराष्ट्रातील युवकांना यामध्ये स्थान मिळत नसल्याने जमिनी अधिग्रहित झाल्याने भूमिहीन झालेल्या युवकांना बेरोजगारीचा सामना देखील करावा लागत आहे.

तसेच या संस्थांच्या लगत असलेल्या जमिनी मध्ये महानगरपालिका बांधकामांना परवानगी देत नाही यामुळे जमिनी भाड्याने देता येत नाही अथवा या परिसरात बांधकाम करता येत नाही. वारंवार पालिकेचे होत असलेली कारवाई यामुळे मराठा समाज हा दोन्ही बाजूने अडचणीत सापडला आहे. जमिनी अधिग्रहित केलेल्या गावांसाठी नोकऱ्यांमध्ये राखीव कोटा ठेवण्यात यावा. तसेच संरक्षण खात्यातलगत असलेल्या जमिनीमध्ये व्यवसाय उभारण्याची परवानगी देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली.

यवेळी महेशदादा सुतार, योगेश सुतार,कैलास रणपिसे,नारायण सुतार अंजिक्य सुतार, छायाताई रणपिसे, उज्वला जाधव, स्वाती रणपिसे तसेच सुतारवाडी परिसरातील महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  कोथरूड मतदार संघावर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रचाराचा नारळ फोडून कामाला लागला – आमदार सचिन आहिर