सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर व माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सुतारवाडी परिसरातील समस्यांची पाहणी केली

सुतारवाडी : सुतारवाडी गावामध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेवुन पुणे मनपा औंध सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर व अभियंता यांच्यासोबत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पाहणी केली.


यावेळी सुतारवाडी बसस्टॅाप जवळ मोठ्या प्रमाणात साचत असलेल्या कचऱ्याबाबत तातडीने उपाययोजना करून हा कचरा प्रश्न तत्काळ सोडविण्यासंदर्भात प्रशासनाला सुचना केल्या.


तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर रस्त्यावर पडलेले खड्डे बुझविणे, ड्रेनेज लाईनवरील तुटलेली-खचलेली झाकणे दुरुस्त करणे, परिसरातील सर्व पथदिवे चालु करणे, रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे, या समस्यांवर देखिल तातडीने उपाय योजना करण्याच्या सुचना यावेळी संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाला करण्यात आल्या.


यावेळी राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, प्रणित सुतार, क्षेत्रिय अधिकारी गिरीश दापकेकर तसेच सर्व विभागाचे कनिष्ट अभियंता, कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

See also  इंडियन डेंटल असोसिएशन, पुणे ( वेस्ट ) ची कार्यकारणी जाहीर