बाणेर :बाणेर नागरी पथसंस्थेचे संस्थापक डॉ. दिलीप मुरकुटे पाटील(मा. सचिव, विश्वस्त भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर) यांच्या वतीने बाणेर, बालेवाडी, सूस, महाळूंगे परिसरातील मुस्लिम बांधवांसाठी रमझान ईद निमित्त सरंजाम वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाविकास आघाडीचे पुणे लोकसभा उमेदवार रविंद्र धंगेकर आणि मौलाना ज. मोहम्मद जफर कासमी उपस्थित होते.
यावेळी परिसरातील वकिलांचा नोटरी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कासार आंबोली गावच्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल रेश्मा गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, समाजाशी एकरूप होऊन त्यांची आवश्यक गरज लक्षात घेत दिलीप मुरकुटे सतत कशाचीहि अपेक्षा न ठेवत काम करत आहे. त्यांच्या या कार्यामुळे येणाऱ्या पुढील काळात समाज त्यांना न्याय देण्याचे काम करेल.
समाजाशी बांधिलकी जपत मुस्लिम बांधवांनी ईद साजरी करता यावी म्हणून दिलीप मुरकुटे ईद सरंजाम भेट देतात. समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याचे काम त्यांनी केले आहे. मुस्लिम बांधवांना ईद सरंजाम वाटप करण्याचे काम फक्त तेच करत आहे. येणाऱ्या पुढील काळात आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू : मौलाना ज. मोहम्मद जफर कासमी
या कार्यक्रमास जेजुरी देवस्थान विस्वस्त पांडुरंग थोरवे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेवक शिवाजी बांगर, विलास सोनवणे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते रवींद्र घाटे, बाणेर नागरी पतसंस्था चेअरमन राजू शेडगे, मा. सरपंच नामदेव गोलांडे, गणपत मुरकुटे, जीवन चाकणकर, राम गायकवाड,मा. सरपंच जंगल रणवरे, संग्राम मुरकुटे, नाना वाळके, महेश सुतार, प्रल्हाद मुरकुटे, अर्जुन शिंदे, अर्जुन ननावरे, विजय विधाते, ज्योती चांदेरे, जालिंदर पाडाळे, पुरुषोत्तम पाडाळे, रखमाजी पाडाळे, अतुल अवचट, आदी मान्यवर उपस्थित होते.