मुळशी तालुक्यामध्ये विविध ठिकानी योग दिन उत्साहात साजरा

पिरंगुट : मुळशी तालुक्यामध्ये पतंजली समिती तर्फे विविध ठिकाणी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विविध सोसायटी शाळा व कंपन्या मध्ये योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

मुळशी तालुक्यामध्ये व वनालीका,मधुपुष्प सोसायटी,मेगा पॉलिसी येथे योग दिन साजरा करण्यात आला.पतंजली समिती चे राजेंद्र नाइकरे यांनी पोमगाव येथील शाळेमध्ये योगा विषयी विध्यार्थ्यांना विशेष माहिती देत प्रात्यक्षिके करून घेतली.प्रकाश देवरे व संजय लोमटे,दीपक राऊत,किशोर काळे,मलकाप्पा चौगुले यांनी कंपन्यांमध्ये पिरंगुट मधील हायस्कूल व घोटावडे न्यू इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्याकडून योगासने करून घेत त्याची माहिती पटवून दिली तर हिंजवडी येथील काही रहिवाशी सोसायट्यामध्ये देखील प्राणायाम व ध्यान यांची प्रात्यक्षिक करून घेतली तेव्हा पतंजलीचे कैलास तनपुरे,शिवाजी तंत्रे,शंकर कोरे,भाऊसाहेब नजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देखील योग दिन साजरा करण्यात आला यामध्ये बसवराज बेन्नी,अभिजीत शिंदे,बाबुराव कोळेकर,किशोर गोळे यांनी साधकाकडून आसन प्राणायाम करून घेतले.

वाॅस इंडिया ग्रुप व अक्वारियस इंजिनिअरिंग कंपनी मध्ये योग दिन उत्सहात साजरा करण्यात आला यामध्ये वाॅस कंपनी चे मुख्य अधिकारी भूषण पारखी यांनी अनेक महिने योगाला प्रोत्साहन देत आहेत तर कंपनीचे एच.आर.हेड देवेंद्र चौधरी,कमल प्रसून,मेघना देशमुख,लक्ष्मीकांत जोशी यांनी योग दिनाचे आयोजन केले व पूजा पारखी यांनी योगाचे महत्त्व समजावून सांगितले.

योग दिनाच्या दिवशी महिलांचाही मोठा सहभाग दिसून आला यामध्ये महेश्वरी लोमटे,संध्या तावरे यांनी पीडीइये इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन साजरा केला.तर कल्याणी राऊत,ओम शांती च्या ज्योती दीदी,उज्वला दीदी यांनी देखील योग दिनाचे महत्त्व महिलांना पटवून सांगितले.

See also  भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेरच्या नवीन कार्यकारिणी निवड