बारामती शिरूर व पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या

पुणे : पुणे कन्टोन्मेंट बोर्ड, इदगाह ट्रस्ट, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना पुणे महानगरपालिका व लष्कर पोलीस स्टेशन आणि शांतता कमिटी यांच्या वतीने आयोजित रमजान ईदच्या कार्यक्रमात बारामती शिरूर व पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सहभागी होत सर्व मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपत प्रेम व सद्भभावनेसह शांतीचा संदेश देणाऱ्या पवित्र रमजान ईदनिमित्त सर्वांच्या जीवनात सुख – समृद्धी, ऐश्वर्य आणि भरभराटी लाभो, या सदिच्छा! यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी महाविकास आघाडीच्या संसदरत्न खा. मा.सुप्रिया सुळे, संसदरत्न खा.मा.अमोल कोल्हे, पुणे लोकसभेच्या उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर, रमेश बागवे, प्रशांत जगताप तसेच इतर मान्यवर मंडळी, पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  गरिबीचे चटके सोसल्याने कष्टातून कमावलेल्या पैशांचे मोल अधिक!- नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे भावनिक उद्गार