अनिस सुंडके यांना एमआयएम ची उमेदवारी

पुणे – महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके यांना एमआयएम पक्षाने पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशानुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी अनिस सुंडके यांच्या उमेदवारीची घोषणा औरंगाबाद येथे केली. उमेदवारी च्या घोषणेनंतर औरंगाबादहून अनिस सुंडके पुण्यात आले आणि त्यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अनिस सुंडके यांच्या नाना पेठेतील घरी असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले, फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटले.

यावेळी विलास कांबळे, मोबीन खान, सुमया पठाण, त्रिशाला गायकवाड, इमाम शेख, रोशनी शेख, सय्यद कुतुबुद्दीन, शोहेब शेख, इरफान शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुजन गौरव समारंभ संपन्न