पाषाण सुतारवाडी परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित, वीजबिल वाढ होऊन देखील वीज पुरवठा खंडित का?

पाषाण : पाषाण सुतारवाडी परिसरामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून ऐन उन्हाळ्यामध्ये वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दिवसातून पाच ते सहा वेळा वीज पुरवठा सुतारवाडी शिवनगर मोरया दर्शन सोसायटी परिसरात खंडित होत आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता वारंवार वीज प्रवाह खंडित होत असल्याने विद्युत उपकरणांचे देखील नुकसान होत आहे.

तसेच महावितरण कडे तक्रारी करून देखील याची योग्य दखल घेतली जात नाही. वीज बिलामध्ये महावितरण वाढ करून देखील वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

See also  अबब... पुणे विभागीत महिला सन्मान योजनेचा ३ लाखाहून महिला प्रवाशांनी घेतला लाभ