छाजेडजी, तुम्ही तरी काँग्रेसनिष्ठ आहात का?अनिस सुंडके यांचा सवाल

पुणे – एमआयएम पक्ष भाजपची बी टीम आहे, असा आरोप करणारे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड हे तरी काँग्रेसनिष्ठ आहेत का? असा सवाल एमआयएम पक्षाचे लोकसभेचे उमेदवार अनिस सुंडके यांनी केला आहे.

भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा पराभव दिसू लागल्याने सुंडके यांची एमआयएम द्वारे उमेदवारी जाहीर होईल अशी व्यवस्था भाजपने केली. भाजपचे हे षडयंत्र आहे, असा आरोप छाजेड यांनी पत्रकाद्वारे केला. त्या आरोपाचा समाचार घेताना अनिस सुंडके यांनी पत्रकात म्हटले आहे की, माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी पुणे विकास आघाडी स्थापन केली होती त्यावेळी काँग्रेस पक्ष सोडून कलमाडी यांच्या आघाडीत छाजेड सामील झाले होते आणि भाजपसोबत प्रचार करत होते, असे अनिस सुंडके यांनी निदर्शनास आणून दिले आहे. शिवाय भवानी पेठ मतदारसंघात काँग्रेसच्या विरोधात जाऊन शिवसेनेचे उमेदवार दीपक पायगुडे यांना मतदान करा, असा प्रचार कितीतरी काँग्रेसजन करत होते, याची आठवण अनिस सुंडके यांनी छाजेड यांना पत्रकातून करून दिली आहे.

माजी मुख्य मंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये सामील झाले. काँग्रेसमध्ये राहून भाजपला आतून मदत करणारे चव्हाणांसारखे काँग्रेसचे अजून कोणते कार्यकर्ते आहेत? याचा विचार करा आणि मग भाजपची खरी बी टीम कोणती? हे छाजेड यांना कळेल, असे अनिस सुंडके यांनी पत्रकात म्हटले आहे.

See also  अजित पवारांना बालेकिल्ल्यातचं मोठा धक्का बसणार?.. पिंपरी चिंचवड मधील शहराध्यक्षांसह अनेक नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट