पुणे : अनुसूचित जाती प्रवर्गातील 2022 च्या सर्व संशोधक विद्यार्थिना बार्टी मार्फत देण्यात येणारी संशोधन अधिछत्रवृती (फेलोशिप) रजिस्ट्रेशन दिनांक पासून सर्व पात्र विद्यार्थीना मिळावे या मागणीसाठी बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांना आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
महासंचालक यांनी सदरील निवेदनाची तत्काळ दखल घेत फेलोशीप यादी जी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे ती यादी दोन दिवसात प्रसिद्ध करू असे आश्वासन दिले व चीफ सेक्रेटरी यांच्याशी पत्रव्यवहार करून उर्वरित मागण्या पूर्तता करण्याचं आश्वासन महासंचालक यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिले तसेच विद्यार्थीच्या मागण्यापूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी दिला.
आंदोलक विद्यार्थी यांची यावेळी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, अक्षय शिंदे सुरेखा भोसले ,प्रशांत कांबळे, निरंजन अडागळे, शिवाजी डोलारे ,अमोल मोरे ,निलेश वांजळे, चांगदेव नेटके, आकाश मुनियान ,विजय साठे आदी उपस्थित होते.