श्री छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल मध्ये 1979 च्या विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर

पुणे : पुन्हा एकदा शाळेत 12 एप्रिल 2024 हा दिवस आमच्यासाठी एकदम संस्मरणीय ठरला. आम्ही श्री छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलचे सन 1979 च्या दहावी बॅचचे सारे मित्रमंडळी पंचेचाळीस वर्षा नंतर पुन्हा एकदा शाळेमध्ये जमा झालो.

त्यावेळच्या दहावीच्या वर्गात जाऊन सारे बसून आम्ही खूप आनंद घेतला. मुख्याध्यापक श्री साठे सर, आदर्श शिक्षक श्री उत्तेकर सर,श्री एम बी जगताप सर ,बाहेर उभे राहून उशिरा आलेल्यांना शिक्षा करणारे मांढरे सर आठवले, मराठी शिकवणारे धुमाळ सर आठवले, मुलाबरोबर हॉलीबॉल खेळणारे आणि आमचे वर्गशिक्षक श्री क्षीरसागर यांची तर खूपच आठवण झाली. आम्ही मधल्या सुट्टी मध्ये आप्पा रप्पीचा खेळत होतो.त्याची खूप प्रकर्षाने आठवण झाली, जेवणाच्या सुट्टीमध्ये गेटवर शाळेच्या चण्यामाण्या बोर व इतर खायच्या वस्तू  मिळायच्या त्याची आनंदाने आठवण झाली. आम्ही शाळेत पोचल्यावर जनगणमन सुरू झाले होते आणि हे गीत गाणारा आमचा श्री अंजन रणदिवे तो तब्येत ठीक नसल्यामुळे येऊ शकला नाही परंतु त्याची प्रकर्षाने आठवण झाली आम्ही सारे जमा झाल्यानंतर श्री संजय जगताप , संभाजी खोपडे, धनंजय गवळी, श्री रमेश चव्हाण, सदाशिव पाटील यांनी छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आम्ही तिथे शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या त्यानंतर श्री अण्णा थोरात हे काही कारणास्तव हजर राहू शकले नाहीत परंतु  त्यांच्या ऑफिस सुपरवायझर श्री विजय जाधव यांनी त्यांच्या सूचनेवरून खूप सहकार्य केले चहा पाणी देऊन आमचे योग्य रीतीने आदरातिथ्य केले. समोरच असलेले वस्तीगृहाची आठवण झाली.वस्तीगृहात राहणारा श्री.विजय गुंड हा त्यावर्षी शाळेमध्ये पहिला आला होता त्याचे ते लाकडी बोर्ड वरचे नाव पाहून तो खूप आनंदित झाला.त्याला श्री चौधरी सर यांची खूप प्रकर्षाने आठवण झाली. जुन्नर येथील आमचा मित्र श्री गणेश परदेशी याने  त्याच्या गावी जूनमध्ये येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. आम्ही शाळेच्या पदाधिकारी यांचा श्री मधुकर जवळकर यांचे हस्ते शाल श्रीफळ व पुषपगुच्छ देऊन आभार मानले.यावेळी श्री अशोक यादव, हनुमंत चव्हाण, चंद्रकांत गावडे, श्रीनिवास गुजर,विजय म्हस्के,अविनाश मांढरे,राजू बोंडे,दत्ता नलावडे,कल्याण खैरे, अविनाश गावडे,अनिल खोपडे,संजय चांदणे,विठ्ठल सिरस हे हजर होते.

See also  मुरलीधर मोहोळ, जनतेला उत्तरे द्या!: मुकुंद किर्दत, आप