पाषाण : एनसीएल या क्रिकेट मैदानावर लेजंड क्रिकेट क्लब या टीमने स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता. या संपूर्ण स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवण्यात आली होती. या स्पर्धेचा अंतिम सामना MVS SAMSHARS XI VS मंगलमूर्ती 11 या संघांमध्ये झाला.
त्यामध्ये मंगलमूर्ती इलेव्हन या संघाचा पराभव करून MVS समशेर टीम या संघाने अजिंक्यपद पटकावले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा सन्मान MVS SAMSHERS TEAM चा कर्णधार यज्ञेश तिजारे हा ठरला. उत्कृष्ट बॉलिंग म्हणून याच टीमचा उप कर्णधार शुभम होनाळे हा ठरला. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून सुतारवाडी पाषाण माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण, सुतारवाडी गावातील माजी स्वीकृत नगरसेवक शिवम आबासाहेब सुतार, पुणे बुलेटीनचे संपादक केदार कदम, पत्रकार मोहसीन शेख उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेता आणि उपविजेता खेळाडूंना गौरवण्यात आले.