पुणे : स्वराज्य पक्षाच्या वतीने खते, बियाणे यांची वाढीव दराने विक्री करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील एका व्यापाऱ्याचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. युरिया ची २६६/- रुपयांची गोणी तब्बल ८००/- रुपयांना विकली जाते अशी धक्कादायक माहिती या माध्यमातून मिळाली. स्वराज्य प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी या विषयी घेतलेल्या पत्रकार परिषदे नंतर कृषी विभागाने तातडीने शेतकऱ्यांची लूट करत असलेल्या ‘ त्या ‘ व्यापाऱ्याचा परवाना रद्द केला आहे.
मात्र हा विषय फक्त एका व्यापाऱ्यापुरता मर्यादित नसून राज्यभरात अशा प्रकारे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. कृषी विभागाने या विषयी गांभीर्यपूर्वक विचार करावा व राज्यात सर्वत्र अशा लुटीचा घटना होऊ नये यासाठी ठोस पावले उचलावीत.
स्वराज्य पक्षाच्या वतीने खते, बियाणे यांची वाढीव दराने विक्री करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील एका व्यापाऱ्याचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. युरिया ची २६६/- रुपयांची गोणी तब्बल ८००/- रुपयांना विकली जाते अशी धक्कादायक माहिती या माध्यमातून मिळाली. स्वराज्य प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी या विषयी घेतलेल्या पत्रकार परिषदे नंतर कृषी विभागाने तातडीने शेतकऱ्यांची लूट करत असलेल्या ‘ त्या ‘ व्यापाऱ्याचा परवाना रद्द केला आहे.
मात्र हा विषय फक्त एका व्यापाऱ्यापुरता मर्यादित नसून राज्यभरात अशा प्रकारे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जागे व्हावे व शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबवावी तसेच कृषी विभागाने या विषयी गांभीर्यपूर्वक विचार करावा व राज्यात सर्वत्र अशा लुटीचा घटना होऊ नये यासाठी ठोस पावले उचलावीत असे आवाहन डॉ.धनंजय जाधव यांनी केले.
घर ताज्या बातम्या स्वराज्य प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत पुरावे देवून पुढे आणलेल्या प्रकरणात...