हडपसर विधानसभा मतदार संघातील माघार घेतलेल्या बहुतांश अपक्षांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

हडपसर : हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उपशहर प्रमुख समीर तुपे, काँग्रेसचे इम्रान शेख, नसीम शेख, मंगेश ससाणे यांच्यासह अनेक दिग्गज उमेदवारांनी निवडणुकीत माघार घेतली आहे, बहुतांश अपक्ष उमेदवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख समीर तुपे, काँग्रेसचे शहर संघटक इम्रान शेख, हडपसर मधील ओबीसी समाजाचे मंगेश ससाणे, तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संदीप लहाने पाटील, ऍड.आयुब शेख, कृष्णा आदमाने, आरपीआयचे यासिन सय्यद, योगेश शिवाजी टिळेकर, कृष्णा कदम, उल्हास तुपे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी आज माघार घेतली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होऊन खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी समजत काढल्याने शिवसेनेचे उपशहर प्रमुख समीर तुपे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, तसेच काँग्रेसचे इम्रान शेख, मंगेश ससाणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन प्रशांत जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे, मराठी क्रांती मोर्चा चे संदीप लहाने पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाचे पालन करत उमेदवारी अर्ज मागे घेतला मनोज दादा जो आदेश देतील त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.


हडपसर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्वच उमेदवारांनी माघार घेतली व महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांना पाठिंबा दिल्याने जगताप यांचे पारडे जड झाले आहे.
यावेळी शिवसेना उबाठा शहरप्रमुख संजय मोरे, माजी नगरसेवक योगेश ससाणे, व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज माघार घेतल्याबद्दल प्रशांत जगताप यांनी आभार मानले.

See also  सार्वजनिक बांधकाम विभागात नवनियुक्त १ हजार ५३० कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप