पाषाण गावठाण शारदा सहकारी बॅंकेसमोरील व सुतारवाडी रोड वरील  ड्रेनेज लाईन दुरुस्तीसाठी मनसेचे निवेदन

पुणे : पाषाण गावठाण शारदा सहकारी बॅंकेसमोरील व सुतारवाडी रोड वरील सुतारवाडी स्मशानभूमी व जय भवानी बागेसमोरील रस्त्यावर कायम ड्रेनेज लाईन तुंबून त्याचे मैलापाणी रस्त्यावर येत आहे. वारंवार ड्रेनेज तुंबून मैलापाणी रस्त्यावर वाहत असल्याने त्याची दुर्गंधी परिसरामध्ये पसरली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे ड्रेनेज वारंवार तुंबल्याने ते उताराच्या दिशेने वाहते त्यामुळे रस्त्यावर शेवाळ होऊन रस्ता निसरडा झाला आहे ते मैलापाणी रस्त्यावर खोलगट भागात जमा होते त्यामुळे या रस्त्यावर वारंवार दुचाकी घसरून अपघात होत आहेत. खोलगट भागात पाणी साचल्याने येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, रहिवाश्यांना व नागरिकांना सदर ठिकाणाहून चालणेही कसरतीचे झाले आहे. डासांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिक थंडी तापाने त्रस्त झाले आहे.

क्षेत्रीय कार्यालयात अनेक वेळा सांगूनही याकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नाही व दुरुस्तीही करत नाहीत. नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता हे ड्रेनेज संबंधितांकडून त्वरित दुरुस्त करण्यात यावे अशाप्रकारचे निवेदन मनसे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय, औंध यांना  मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

See also  आम आदमी पार्टी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या मैदानात