औंध परिसरात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा नागरिकांसोबत ‘निर्भय वॉक’

औंध : औंध येथे वाढत असलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी परिहार चौका जवळील रॉय चौधरी या ज्येष्ठ नागरिकाचा खून झालेल्या ठिकाणाची पाहणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते शिरीन गार्डन डीपी रोड पर्यंत फुटपाथ वरून चालत पाहणी केली तसेच नागरिकांशी संवाद साधला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्भय वॉक मुळे औंध परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे.


अतिरिक्त पोलीस आयुक्त – मनोज पाटील, डिसीपी – विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त – आरती बनसोडे उपायुक्त गुन्हे- अमोल झेंडे, – गुन्हे उपायुक्त -रोहिदास पवार (वाहतूक) , पोलिस निरीक्षक शैलेश संखे, वाहतूक पोलीस निरीक्षक – शफिल पठाण , माजी नगरसेविका अर्चना मुसळे, एडवोकेट मधुकर मुसळे आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी परिसरातील अवैद्य धंदे, पादचारी मार्गावरील अनाधिकृत टपऱ्या, तसेच बेशिस्त वाहन चालत, अनाधिकृतरित्या रस्त्यांवर मांडण्यात आलेले स्टॉल यावर तातडीने कारवाई करण्याची सूचना यावेळी दिली.

या ‘निर्भय वॉक’ दरम्यान औंध परिसरातील नागरिकांचे कायदा व सुव्यवस्थेबाबत असलेले प्रश्न पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाणून घेतले. रस्त्यावर दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या तसेच आवश्यक त्या ठिकाणी महानगरपालिकेला कारवाईसाठी बंदोबस्त पुरवण्यात येईल याबाबत अश्वस्त करण्यात आले.

See also  औंध येथील अतिक्रमणावर पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग व औंध क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने संयुक्त कारवाई