कोथरूड कर्वे पुतळा चौकाजवळील अनाधिकृत शेड्सवर कारवाईची मागणी

कोथरूड : कोथरूड कर्वेनगर पुतळा चौकाजवळ मधुवंती सोसायटीच्या लगत अनाधिकृत बेकायदेशीर पत्र्याची शेड उभारली जात असून यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

कोथरूड कर्वेनगर रस्ता हा रहदारीचा रस्ता असून या रस्त्यावरील अनाधिकृत पत्र्याच्या शेड्स मधील दुकानांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. तसेच या अनाधिकृत पत्र्याच्या शेड्स ला पालिकेचे टॅक्स नसल्यामुळे महानगरपालिकेचा लाखो रुपयांचा महसूल देखील बुडवला जात आहे.

सोसायटीच्या आवारामध्ये पत्र्याचे अनधिकृत शेड बांधून त्यात गाळे काढण्यात आले असून मुख्य रस्त्यांवर अशी परवानगी देण्यात आले आहे काय असा प्रश्न उपस्थित केला जात असून यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

बांधकाम विभागाचे अधिकारी ईश्वर ढमाले म्हणाले, मुख्य रस्त्यावर अनाधिकृत शेड उभारण्यासाठी परवानगी देण्यात येत नाही. सदर शेड अनाधिकृत आहे काय हे तपासून तातडीने कारवाई करण्यात येईल.

See also  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान स्वप्निल कुसळे यास २ कोटी रुपये तर सचिन खिलारी यास ३ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द