आ. शिरोळेंनी केली पोलिसांसमवेत औंध परिसराची पहाणी

पुणे : रहिवाशांच्या सुरक्षिततेबाबत दिलासा देण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सोमवारी औंध परिसराची पहाणी  केली.

औंधमध्ये अलीकडेच झालेल्या दुःखद हल्ल्याचा पाठपुरावा म्हणून, पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, औंधमधील परिहार चौक, डीपी रोड, नागरस रोड आणि आजूबाजूच्या परिसराची सोमवारी पायी फिरून पहाणी केली. स्थानिक रहिवासी, पायी फेरफटका मारणारे आणि जॉगर्स यांच्यासमवेत गैरकृत्य चालणाऱ्या आणि धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागांची पहाणी केली, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

पोलिस बंदोबस्त आणि सुरक्षा उपाय वाढविण्यास सांगितले आहे. नागरिकांची सुरक्षा  लक्षात घेता पोलिसांनी मला योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

See also  श्री शिवाजी विद्यामंदिरामध्ये 25 वर्षांनी पुन्हा एकदा भरला वर्ग