औंध : औंध परिसरातील विद्युत, कचरा, अतिक्रमण आदी समस्यांबाबत नागरिकांनी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे व औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आयोजित यांच्या बैठकीमध्ये पाढा वाचला.
यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, माजी उपमहापौर वाडेकर, माजी नगरसेवक बंडू ढोरे, माजी नगरसेवक सनी निम्हण, माजी नगरसेवक आनंद छाजेड, सचिन वाडेकर, बाळासाहेब रानवडे, सौरभ कुंडलीक, संजय कांबळे, सचिन मानवतकर, अभिजित गायकवाड, सुप्रीम चोंधे, अनिल भिसे, सुभाष पाडळे, सागर मदने, विजय जाधव अभियंता लांडे आदी उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी औंध बोपोडी परिसरातील बंद पथदिवे, रस्त्यांवर टाकला जाणारा राडारोडा, फुटपाथ वरील अनाधिकृत टपऱ्या, मोकळ्या जागांमध्ये दारू पिणाऱ्यावर कारवाई, रस्त्यांवर आलेले होर्डिंग आदी विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी विविध सोसायट्यांचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.
घर ताज्या बातम्या आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या उपस्थितीत औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयात बैठक, नागरिकांनी वाचला...























