पुण्यात आठवतंय का ? फ्लेक्स ची जोरदार चर्चा

पुणे : आठवतंय का ? म्हणत पुण्यातील मध्यवर्ती भागात डैक्कन बालगंधर्व चौक जंगली महाराज रोड सर्वच परिसरात प्रस्थापित भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांची खरडपट्टी करण्यात येत आहे.

आज पुणे येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाचा स्थापना सोहळा आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाच्या वतीने सर्वच प्रस्थापित पक्षांची जखमेवर मीट चोळण्यात येत आहे.

आज सकाळपासूनच पुण्यात “आठवतय का ?” या मथळ्याखाली वेगवेगळे बॅनर झळकले आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी वेळोवेळी दिलेली आश्वासने, घेतलेल्या राजकीय भूमिका व ऐनवेळी मारलेल्या पलट्या यांवर जोरदार भाष्य करत या नेत्यांच्या दुटप्पीपणावर जोरदार हल्ला केला आहे. अशी फसवणूक नको असेल तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला मत द्या, असे आवाहनही जनतेला करण्यात आले आहे.

@ आठवतंय का ?

धनगर बांधवांशी गद्दारी
तेव्हा
आमची सत्ता आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला एस. टी. मध्ये आरक्षण देणार
– देवेंद्र फडणवीस (२०१३)
आता
१० वर्षे होऊन देखील धनगर समाजाला एस. टी. मधून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलने करावे लागत आहे.


सत्तेसाठी विचारांशी गद्दारी
तेव्हा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
” काँग्रेस सोबत कधीही जाणार नाही, वेळ पडली तर मी माझी शिवसेना बंद करेल पण काँग्रेस सोबत जाणार नाही. “
आता
उद्धव बाळासाहेब ठाकरे
” मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस सोबत जाऊन आपल्या वडिलांच्या विचारधारेला मातीत घातले, हिंदुत्व सोडून टाकले “


हिंदुत्ववादी विचारधारेशी गद्दारी
निवडणुकीपूर्वी
२०१९ ची विधानसभा निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा – शिवसेनेने युती करून लढवली होती. महाराष्ट्राच्या जनतेने याच युतीला कौल दिला होता.
निवडणुकीनंतर
हिंदुत्वाला’ रामराम’ करून भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी च्या अजित पवार यांच्या सोबत ७२ तासांचे सरकार स्थापन केले होते. त्या नंतर हिंदुत्ववादी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते


सत्तेसाठी मारलेली पलटी
१९९८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपूर्वी ” इटलीच्या बाईच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू शकत नाही. आम्ही काँग्रेस च्या बाहेर पडून नवीन पक्ष स्थापन करत आहोत – शरद पवार

१९९९ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेनंतर ” सोनिया गांधी यांच्या काँग्रेस पक्षाशी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. “



मुख्यमंत्रीपदासाठी भूमिका बदलली

२०१८ मध्ये
” माझ्या शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या भाजपसोबत मी मांडीला मांडी लावून सत्तेत बसू शकत नाही, म्हणून मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देतो” – एकनाथ शिंदे
२०२२ मध्ये
” सुरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करून मुख्यमंत्री पदासाठी त्याच भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापन केली. “


@ आठवतंय का ?

महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी
तेव्हा आमची सत्ता आल्यास भ्रष्टाचारी अजित पवार यांना तुरुंगात टाकू…… अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग !
– देवेंद्र फडणवीस
आता
अजित पवार हे याच देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी बनवलेले ७२ तासांचे सरकार देखील अजित पवार यांना सोबत घेवून बनवले होते.

See also  महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन

अशा दुहेरी वक्तव्यांची चर्चा लेकच्या माध्यमातून करत स्वराज्य पक्षाने पुणे शहरात सर्वच महत्त्वाच्या राजकीय पक्षांवर जोरदार फ्लेक्सच्या माध्यमातून टीका केली आहे.