औंध डी मार्ट च्या पार्किंगच्या जागेत व्यवसाय यामुळे नागरिकांना करावे लागते रस्त्यावर पार्किंग

औंध : औंध येथील डी मार्ट समोरील पार्किंग मध्ये व्यवसाय करण्यात येत असून डी मार्ट च्या समोर मात्र पार्किंग फुलचे बोर्ड लावले जात आहेत यामुळे डी मार्ट समोरील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो.

डी मार्ट औंध येथे सुट्ट्यांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदी करण्यासाठी येत असतात. यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना पार्किंग मध्ये जागा मिळत नसल्याने हे ग्राहक रस्त्यावर गाड्या लावतात. अनेकदा दुहेरी पार्किंग देखील डी मार्ट समोर होत असल्याचे पाहायला मिळते. तसेच सांगवी कडे जाणाऱ्या पुलावर देखील वाहनांच्या पार्किंगच्या मुळे वाहतूक कोंडी निर्माण होते.

डी मार्ट च्या समोरील जागेमध्ये पार्किंग आवश्यक असताना देखील अनधिकृत रित्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. पार्किंगच्या जागेचा वापर अन्य कारणासाठी होत असल्याने वाहन चालकांना रस्त्यावर वाहने लावावी लागतात. तसेच डी मार्ट समोरील दुभाजक देखील योग्य ठिकाणी करणे आवश्यक असून डी मार्ट मधील वाहने बाहेर पडल्या नंतर या परिसरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच अनेक लहान मोठे अपघात देखील सातत्याने घडतात.

डी मार्ट परिसरातील पार्किंग मधील अनाधिकृत व्यावसायिक वापर बंद करण्यात यावा व ही जागा ग्राहकांसाठी पार्किंग म्हणून खुली करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  प्रदेश प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ॲड डॉक्टर मधुकर मुसळे यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघामध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल