बालवडकर प्राथमिक शाळेमध्ये स्कॉलरशिप परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न

बालेवाडी : कै बाबुराव शेठजी बालवडकर प्राथमिक शाळा बालेवाडी या शाळेमध्ये स्कॉलरशिप इयत्ता पाचवी चे विद्यार्थी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे कौतुक सोहळा आणि शालेय पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालेवाडी गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप बाबुराव  बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री राहुल बालवडकर, भूमाता कृषी मंच पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अनिल बालवडकर,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष संदीप भाऊ बालवडकर ,  स्वाभिमानी प्रवासी वाहतूक संघटनेचे पुणे शहराध्यक्ष दिलीप भाऊ बालवडकर, बालेवाडी गावचे पोलीस पाटील आनंदराव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक बालवडकर, महादेव कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते हर्षल तापकीर , शाळेतील उपस्थित मुख्याध्यापिका सौ कल्पना बाबर, घोरपडे मॅडम सुकेसेनी मोरे मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना अतिशय परिश्रम घेऊन अशोक वाघमारे,  दिवसेन धोटे, तनुश्री ताजणे मॅडम यांनी मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला पवार मॅडम यांनी केले.

See also  आगामी शिवजयंती उत्सव सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख