हिवरे कुंभार शाळेची शिष्यवृत्ती परंपरा अखंडित

पुणे : हिवरे कुंभार ता.शिरूर,जि.पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेची यशस्वी परंपरा कायम राखत शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवले आहे. शाळेचे 26 पैकी 2 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले असून त्यांच्यासह 10 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना सौ.आश्विनी किरण जाधव मॅडमचे मार्गदर्शन मिळाले.

यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे-
1)सृष्टी तुकाराम जगताप 274 राज्यात बारावी २)श्रेया तुषार डोळस 274 राज्यात बारावी (नवोदय विद्यालय निवड ) ३)पृथ्वीराज पांडुरंग मांदळे 264 ४)साईराज अशोक खैरे 260 ५)आराध्या बजरंग गुंजाळ 256 ६)हर्ष जयदीप तांबे 252 ७)सुप्रिया दादाभाऊ गायकवाड 248 ८)अक्षदा अनिल गायकवाड 246  ९) मानसी चंद्रकांत शिंदे 246  १०)अन्विता वसंत मांदळे 244  ११) सोहम विजय आर्विकर 234 .


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सौ.अंजना चौधरी मॅडम आणि श्री.शुकराज पंचरास सर,सर्व शिक्षक स्टाफ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा राजश्री तांबे,उपाध्यक्ष जालिंदर थोरात,आजी-माजी सरपंच उपसरपंच, सर्व आजी-माजी पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ,केंद्रप्रमुख  प्रकाश लंघे सर,विस्तार अधिकारी वंदना शिंदे,गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर आदींनी अभिनंदन केले तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.राजश्री तांबे यांनी उपस्थितांचे‌ आभार मानले.

See also  देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा, राज्यातील सर्व ज्येष्ठांना लाभ!