येरवडा : खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी मनोविकृती प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा येथे भेट देऊन चालत असणारी रुग्णसेवा प्रणालीची माहिती घेतली व तेथील डॉक्टर, कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या बरोबर चर्चा केली.
अतिशय जुन्या इमारती, नूतन अद्ययावत इमारतींची आवश्यकता पाणी आणि ड्रेनेज व्यवस्थेत सुधारणा करण्याची आवश्यकता,
आधुनिक आणि उपयुक्त व्यावसायिक शिक्षणाची गरज, वर्षानुवर्षे येथेच राहणार्या रुग्णांचा विचार, कुटुंबाची जबाबदारी झटकण्याची मानसिकता, लांबून येणार्या रुग्णांसाठी पुरेशी दीर्घ मुदतीची औषधे देण्याची क्षमता, त्यासाठी अधिक निधीची तरतूद या आणि अश्या अनेक मुद्यांवर चर्चा झाली.
या सर्व विषयात स्वतः लक्ष घालून अडचणी सोडविण्याचे आश्वासन खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिले.
त्यावेळी वैद्यकीय अधिक्षक सुनिल पाटील, सहाय्यक संचालक प्रशांत वाडीकर, भाऊसाहेब माने, उपअधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड, भुलरोग तज्ञ डॉ.पल्लवी तारळकर, वरिष्ठ मनोविकृती तज्ञ, डॉ. संदीप महामुनी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.