पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने लोकशाहीर, थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी सारसबागे जवळील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अण्णाभाऊंच्या लिखाणामध्ये संविधानिक मूल्यांचा प्रसार आढळतो. त्यांनी लिहिलेले साहित्य जगातील तब्बल २२ भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. केवळ आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी साहित्य क्षेत्रात अद्वितीय काम करून ठेवले. त्यांच्या स्मृतीना अभिवादन करण्यात आले.
अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे , शहर सरचिटणीस राजेंद्र आबा शिळीमकर , गणेश शेरला व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे उत्सव समितीचे प्रमुख सदा डावरे , सचिव सनि डाडर, महेश सकट, किरण वैष्णव मान्यवर उपस्थित होते.
























