सुतारवाडी येथे रणपिसे विठ्ठल मंदिरात रांगोळीतून साकारली पांडुरंगाची प्रतिमा

सुतारवाडी : आषाढी एकादशी निमित्त समस्त रणपिसे विठ्ठल मंदिर सुतारवाडी येथे अभिजित सुतार या कलाकारांने रांगोळी मध्ये साकारलेली पांडुरंगाची प्रतिमा साकारली.

तब्बल सात तास रांगोळी द्वारे पांडुरंगाची अप्रतिम रांगोळी त्याने साकारली. चार फूट उंचीचे हे रांगोळी मंदिरामध्ये आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. रांगोळीच्या माध्यमातून सेवा साकार आषाढी निमित्त सेवा करण्याची संधी मिळाली याचा आनंद व्यक्त करण्यात आला.

सुतारवाडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आषाढी एकादशीनिमित्त करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला

See also  जातनिहाय जनगणना अल्पसंख्याकांसाठी गरजेचीकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे प्रतिपादन