बाणेर येथे पंचशील युवक संघच्या वतीने डॉ. आंबेडकर जयंती विविध उपक्रमाने साजरी

बाणेर : पंचशील युवक संघ आंबेडकर नगर बाणेर च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी प्रमुख उपस्थिती शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश तात्या बालवडकर , राष्ट्रीय काँग्रेस युवा नेते जीवन चाकणकर, भाजपा युवा नेते शुभम बालवडकर, युवा नेते जयेश मुरकुटे, हे उपस्थित होते.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली तसेच परिसरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप आधी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक उदय रणवरे यांनी केले व आभार प्रदर्शन वंचित बहुजन आघाडी पुणे शहर संघटक सतीश रणवरे यांनी केले.

See also  खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल