औंध डीपी रोड परिसरात झाडे पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प

औंध : औंध डीपी रोड परिसरामध्ये जोरदार पावसामुळे झाडे कोण म्हणून पडल्याने चार चाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

औंध मेडिपॉइंट हॉस्पिटल जवळ पावसामुळे झाडे पडल्याचे घटना घडली. चार चाकी वाहनांवर झाडाच्या फांद्या पडल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान या परिसरात वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. अग्निशामक दल व पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने तात्काळ झाडे बाजूला करण्यात आली.

तसेच जेसीबीच्या सहाय्याने फांद्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. झाडाखाली तसेच जाहिरात बॅनरच्या ठिकाणी आपल्या गाड्या लावू नये. तसेच साठलेल्या पाण्यात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या तिने करण्यात आले आहे.

See also  एसटी महामंडळ दरवर्षी स्व मालकीच्या ५ हजार लालपरी बसेस खरेदी करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक