पुणे : बाणेर बालेवाडी पाषाण सुस महाळुंगे परिसरामध्ये अति पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडणे तसेच सोसायटीच्या पार्किंग मध्ये पाणी साठण्याच्या घटना घडत आहेत यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून मदत कार्य पोहोचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आले असून माध्यमातून नागरिकांना सहकार्य केले जात आहे.
अती पावसामुळे बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, म्हाळुंगे भागात अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. त्यामुळे लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासाठी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. क्विक रिस्पॉन्स टीम च्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना येत असलेल्या समस्या सोडवण्याचे काम केले जात आहे.
नागरिकांना येणाऱ्या समस्यांचा विचार करून अमोल बालवडकर यांनी स्वतः रस्त्यावर उतरत नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
अमोल बालवडकर म्हणाले , अति पावसामुळे अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी येत आहेत. नागरिकांना येणाऱ्या समस्यांसाठी व शक्य ती मदत पोहोचवण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आले आहे. तरी ज्यांना जनरेटर, ॲम्बुलन्स, पाणी टँकर, जेसीबी, मड पंप व इतर कोणतीही मदत हवी असेल तर त्यासाठी अमोल बालवडकर यांच्या बाणेर व बालेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयाशी या क्रमांकावर 9028790999 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
रस्त्यावर साचत असलेले पाणी तसेच पडलेले वृक्ष व सोसायटीच्या पार्किंग मध्ये साठलेले पाणी याची पाहणी करण्यात आली असून प्रशासनाला देखील कळवण्यात आले आहे तसेच अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून देखील शक्य ती मदत पोहोचवण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता संपर्क साधावा व आपल्या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी सांगाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.