पुणे, दि.२१ : छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘मराठा लष्करी भूप्रदेश’अंतर्गत जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनाच्या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम जिल्हा प्रशासन, तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नौरोसजी वाडिया महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला.
यावेळी पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. व्ही. चाबुकस्वार, उप जिल्हा नियोजन अधिकारी गणेश दानी, नौरोसजी वाडिया महाविद्यालयाच्या डॉ. मंजुषा मुसमदे, समन्वयक प्रा. प्रमिला दस्तुरे, विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या जनजागृती मोहीमेबाबत माहिती देऊन डॉ. वाहणे म्हणाले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित किल्ल्यांबाबत जनजागृतीच्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध उपक्रम, जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहेत. या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. वाहणे यांनी केले.
यावेळी लोहगड किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ नामांकन यादीत समावेशनाबाबत प्रोत्साहनात्मक स्वाक्षरी मोहीमही आयोजित करण्यात आली.
घर ताज्या बातम्या गड किल्ल्यांच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनाबाबत नौरोसजी वाडिया महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम...