आम आदमी पक्षाच्या वतीने रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात पावस्कर यांच्या कार्यालयात निदर्शने..

पुणे : देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींनी पुणे पोलिसांना पत्र लिहून माननीय पंतप्रधान यांच्या पुणे दौऱ्या आधी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आदेश दिल्याने, पुण्यातील रस्त्यांची अवस्था काय आहे याची पोलखोल झालेली असून राष्ट्रपतींना अशाप्रकारे हस्तक्षेप करावा लागणे म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाचे मोठे अपयश असल्याचे आम आदमी पक्षाच्या वतीने सांगत पथविभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांच्या कार्यालयात त्यांच्या खुर्चीला हार घालत निषेध आंदोलन करण्यात आले.

पुण्यातील व्हीआयपी समजल्या जाणाऱ्या रस्त्याचे चित्र जर राष्ट्रपती स्वतः महापालिकेला दाखवत असतील तर शहरातील नागरिक वापरत असलेल्या इतर रस्त्यांची काय अवस्था असेल आणि नागरिक कशाप्रकारे व्यवस्थेतील अनास्थेचे बळी ठरत आहेत याचे उत्तर महापालिका देणार का? टॅक्स स्वरूपात महापालिका हजारो कोटी रुपयांचा कर गोळा करते परंतु हा कर पायाभूत सुविधांवर खर्च न करता केवळ दिखाऊपणावर खर्च केला जातो. चांगला रस्ता हा सर्वसामान्य नागरिकांचा मूलभूत अधिकार असून देखील त्याच्यासाठी नागरिकांना झगडावे लागत आहे आणि अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसून असतात हे चित्र कुठेतरी बदलायला हवे. सत्ताधारी पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी कधीही रस्त्यातील खड्ड्यांच्या विषयावर बोलत नसून विरोधकांनी या विषयावर बोलण्यास सुरुवात केली की राजकारण करू नका असा सल्ला मात्र त्यांच्याकडून दिला जातो असे चित्र दिसून येते.

राष्ट्रपतींनी दिलेल्या पत्रानंतर पुणेकरांच्या हक्कासाठी आज आम आदमी पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांच्या कार्यालयात आम आदमी पक्षाच्या वतीने राष्ट्रपतींचा फोटो हातात घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. सरकारी व्यवस्थेच्या अनास्थेपायी पुणेकरांना वारंवार महत्त्वाच्या व्यक्तींसमोर अपमानित व्हावे लागत असून खराब रस्त्यांमुळे पुण्याचे नावलौकिक महापालिकेने धुळीसं मिळाल्याचा आरोप यावेळी पक्षाच्या वतीने करण्यात आला.

तसेचं वारंवार पाठपुरावा करूनही पालिकेला घाम फुटत नाही, अधिकारी कारवाई करत नाहीत. भाजप त्यांच्या लाडक्या ठेकेदार यांना पालिका अधिकारी घाबरत आहेत का? नवीन बनवलेले रस्ते एका वर्षात खराब होतात, बुजवलेले खड्डे 5 दिवसात खराब होत आहेत. किती मोठं भ्रष्टाचार भाजप हे  कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांच्या मार्फत घडवून आणत आहे याचा अंदाज पुणेकरांना आला आहे. आम आदमी पार्टी च्या सर्व पदाधिकाऱ्यांचा संयम सुटला आहे आत्ता, हजारो वेळी फोन करून, पत्रव्यवहार, आंदोलन करून प्रश्न सुटत नसल्याने पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांची खुर्ची उचलून टेबल वर ठेवून तिला पुष्पहार अर्पण करत निषेध केला.

सर्व खड्डे 5 दिवसात बुजवले नाहीत तर आम्ही पालिकेला टाळे ठोकू. दुर्दैव म्हणजे महामहील राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांनी पालिकेला खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. पुणे शहराची नाचक्की भाजप च्या कार्यकाळात जास्त होत आहे.
– श्री सुदर्शन जगदाळे, पुणे शहर अध्यक्ष.

पालिकेला जाग यावी म्हणून श्री अनिरुद्ध पावसकर यांची खुर्ची उचलून टेबल वर ठवली आणि हार फुल घातले. कारवाई झाली नाही तरी चप्पल चा पुष्पहार घालू.
– श्री सतीश यादव, महासचिव.


See also  महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन