पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पर्यावरण विभागचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांना दिले मृत मासे भेट दिले

पिंपरी :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पर्यावरण विभागचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांना दिले मृत मासे भेट दिले.

पिंपळे निलख येथिल स्मशानभूमी येथे नागरिकांना मृत माशांचा खच आढळून आला त्यानुसार सदर ठिकाणची पाहणी केली असता दुषित पाण्यामुळे या माशांचा खच पडला आहे.गेल्या वर्षीसुद्धा पवना नदीपात्रातील केजुबाई धरण येथे सुद्धा असाच माशांचा खच आढळून आला हे सर्व वारंवार घडत आहे.या सर्व प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.मुळा नदी वाकड , कस्पटे वस्ती, विशाल नगर पिंपळे निलख,सांगवी या ठीकाणाहून वाहते .या नदीपात्रातील पाणी मोठ्या प्रमाणावर दुषित झाले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातुन वाहणाऱ्या तीन्ही नदीपात्रावर असलेल्या STP प्रकल्पांची त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आयुक्तांना भेटून केली आणि पर्यावरण विभागचे मुख्य अभियंता यांना मृत मासे भेट दिले.  केलेल्या कारवाई संदर्भात आम्हास लेखी उत्तराद्वारे कळवावे अशी मागणी रविराज काळे यांनी केली.

See also  पुण्याचा रिंग रोड प्रकल्प लवकर मार्गी लावावा आमदार शिरोळे यांची राज्य सरकारकडे मागणी