भिडे वाड्याची जागा पुणे महापालिकेच्या ताब्यात देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश;मनसे तर्फे साखर वाटून आनंदोत्सव साजरा

पुणे : महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा या वाड्यात सुरू केली
क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने पावन झालेल्या भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर या निर्णयामुळे होणार आहे , येथे लवकरात लवकर राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी श्री राजसाहेबांनी राज्य सरकारला पत्र लिहीत मागणी केली होती.


आता स्मारकाचा मार्ग मोकळा आहे .या स्मारकाच्या माध्यमातून अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल..! याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मनसे तर्फे साखर वाटप करून फटाके वाजवण्यात आले .यावेळी श्री वसंत खुटवड ,श्री रवि सहाणे,श्री अजय राजवाडे, श्री विशाल ओदेल ,सौ आरती सहाणे आदी उपस्थित होते.

See also  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत लघु उद्योग व्यवसायासाठी थेट कर्ज योजना