संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाची पुणे पोलिसांना वानवडी येथे ८ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची धिंड काढण्याची मागणी – धनंजय जाधव स्वराज्य सरचिटणीस

पुणे : पुणे शहराला सांस्कृतिक राजधानी व शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. राज्यामध्ये सध्या स्त्री अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कायदा व सुव्यवस्था राहिलेली

नाही व महिलांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झालेली आहे, तसेच कायद्याचा धाक राहिलेला नाही. याला पाबंध घालणे ही वेळेची गरज आहे.

दोन दिवसांपुर्वी पुण्यातील वानवडी भागात ८ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली, आज बोपदेव घाटामध्ये गॅंगरेप ची घटना घडली. या आरोपीची पोलीस संरक्षणामध्ये धिंड काढण्यात यावी, अशी आम्ही मागणी करत आहोत.

जेणेकरून भविष्यात जर कोणी अत्याचार करायचा विचार केला तरीही त्याच्यावर या घटनेचा परिणाम होईल व सामाजिक वातावरण शांत होण्यास मदत होईल. आश्या आशयाचे निवेदन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना दिले आहे.

See also  कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या प्रशिक्षणार्थी आरोग्य निरिक्षक व स्वच्छ समन्वयकाचा स्वच्छता ही सेवा - २०२४ साठी थरार.....…...!