एकता महिला ग्रुप चा नवरात्री विशेष नवदुर्गा सन्मान सफाई कामगार महिलांचा सन्मान

पुणे : एकता महिला ग्रुप चा नवरात्री विशेष नवदुर्गा सन्मान सफाई कामगार महिलांचा सन्मान “सन्मान तिच्या अस्तित्वाचा, आदर तिच्या असण्याचा” ही संकल्पना नवरात्रात उत्सवात राबवली.एकता ग्रुप मधील महिलांनी समाजाला साद घालून  नवीन साड्या  खरेदी करून साडया या उपक्रमात दिल्या, या माध्यमातून  दुर्गांची पूजा करण्याचा हा संकल्प  सुरू करण्यात आला.

हांडेवाडी नगरपालिका (श्री,गणेश पांडुरंग साठेसर Esi )(श्री,दामोदर गणपत कांबळेसर Mukadam ) (सरला दत्तात्रय गायकवाड मॅडम Mukadam )यांच्या हस्ते  एकता ग्रुप मधील महिलांनाचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैशाली वाडकर , संध्या शेंडगे, मोनिका लालसरे, गौरी सोमण, प्रविणा चिंचमलातपुरे, शिल्पा हुलगुत्ते, विद्या राजगुरू , अर्चना पुस्तके, सारिका दानवे, माधवी सुवारे उपस्थित होते.

See also  महाराष्ट्र गांधी स्मारक कोथरूड येथील गांधी दर्शन शिबिराला खासदार सुप्रिया सुळे यांची भेट