कोथरूड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे उमेदवार

कोथरूड : कोथरूड विधानसभा मतदार संघामधून उत्सुकता निर्माण झालेल्या महाविकास आघाडीचा उमेदवार अखेर जाहीर करण्यात आला शिवसेनेच्या माजी आमदार असलेल्या चंद्रकांत मोकाटे यांना शिवसेनेने उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले.

कोथरूड मतदार संघामध्ये कालपर्यंत पृथ्वीराज सुतार व अमोल बालवडकर यांच्या नावाची चर्चा आघाडीवर होती. राजकारणामध्ये ट्विस्ट निर्माण करत अखेर शिवसेनेने माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी जाहीर केली.

काल रात्री निष्ठावंत शिवसैनिकांची बैठक झाल्यानंतर शिवसेनेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्यावा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती. चंद्रकांत मोकाटे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता पृथ्वीराज सुतार व अमोल बालवडकर यांचे भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

चंद्रकांत मोकाटे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा केला.

See also  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेतले प्रा. हरी नरके यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन