शिवाजीनगर मतदार संघामध्ये पुन्हा शिरोळे विरुद्ध बहिरट काटे की टक्कर

पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने दत्ता बहिरट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मागील निवडणुकीमध्ये झालेली भाजपाचे सिद्धार्थ शिरोळे विरुद्ध काँग्रेसचे दत्ता बहिरट ही लढत पुन्हा एकदा राजकीय पटावर रंगणार आहे.

भाजपा व काँग्रेस यांची जवळपास समान मतदान असलेला मतदार संघ काही हजारांच्या फरकाने विजय निश्चित करणारा ठरतो. यामुळे निवडणुकीच्या रिंगणात मध्ये मुद्द्यांवर भर देऊन तसेच स्थानिक पातळीवर घेतले जाणारे निर्णय यावर अधिक लक्ष उमेदवारांकडून दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागील वेळी भाजपाच्या सिद्धार्थ शिरोळे यांनी दत्ता बहिरट यांचा अत्यंत कमी मतांनी पराभव केला होता. ऐनवेळी भाजपामध्ये दाखल झालेले दत्तात्रय गायकवाड, बाळासाहेब रानवडे, आनंद छाजेड, मुकारी अलगुडे यांच्यामुळे भाजपाची स्थिती 2019 साली मजबूत झाली आणि बहिरट यांना पराभवाचा सामना करावा लागला.

यंदा लोकसभेला काँग्रेस पक्षाला शिवाजीनगर मतदार संघामध्ये प्रभावी मतदान झाले आहे. यामुळे काँग्रेस पक्ष काटेकी टक्कर देण्याच्या तयारीत दिसत आहे. तर भाजपाने देखील आपली मजबूत रणनीती सादर केली आहे. प्रचारामध्ये सिद्धार्थ शिरोळे यांना आघाडी घेण्याची संधी मिळाली असून भाजपा या संधीचा फायदा कसा घेणार याकडे लक्ष लागले आहे. तर भाजपामध्ये काहीसे अंतर्गत नाराजी नाट्य देखील काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. यावर काय उपाययोजना केला जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

See also  येरवडा येथील क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा