पुणे : आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासून सातत्याने पक्षनिष्ठा, कार्यतत्परता आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याची वृत्ती दाखवणारे धडाडीचे कार्यकर्ते श्री. आबासाहेब नामदेव कांबळे यांची पुणे शहर संघटन मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. कांबळे यांनी पक्षातील विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. प्रभाग क्र. 13 सुस–म्हाळुंगे–बाणेर येथील मा. अध्यक्ष तसेच आप PMC जल हक्क आंदोलन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पुणे शहरातील गंभीर पाणीप्रश्नांवर प्रभावी आंदोलने उभारून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
त्यांच्या आजवरच्या कार्याचा दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना पुणे शहर संघटन मंत्रीपदी नेमणूक करून पक्षाची संघटना अधिक बळकट करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
या प्रसंगी आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अजित फाटके पाटील, महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. मुकुंद किर्दत, महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. अभिजित मोरे तसेच आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री. सुदर्शन जगदाळे उपस्थित होते.